बेळगांव:२३ऑक्टोबर २०२४ रोजी दी कर्नाटक लॉ सोसायटीच्या वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक टिळकवाडी बेळगांव येथे दोन दिवशीय “संस्कृती २०२४-२५” चे आयोजन करण्यात आले होते. जिथे विद्यार्थ्यांच्या प्रतिभा आणि पारंपरिक कलागुणांना वाव देण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्या श्रीमती श्रीदेवी मालाज आणि शिक्षकबूंद यांनी संस्कृती बॅनर अनावरण करून करण्यात आले.कॉलेजची यांत्रिक विभागाची विद्यार्थिनी कुमारी निवेदिता खोत हिच्या सांस्कृतिक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्राचार्यांनी आपल्या भाषणामध्ये संस्कृती आणि परंपरेचे महत्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व वाढीसाठी उपयोगाचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा म्हणून प्रोत्साहन दिले.
स्पर्धांमध्ये वाद्य संगीत, कविता सादरीकरण, फळ-भाजी शिल्पकला, चित्रकला, गायन, रांगोळी, छायाचित्रण,आणि नृत्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता.ज्यातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवता
*Governing council चे चेअरमन श्री उदय एन् कालकुंद्रिकर सर आणि सर्व सदस्य यांचा सततचा पाठिंबा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रेरणादायी ठरला.संस्कृती २०२४-२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रतिभा आणि पारंपरिक सादरीकरणाचे प्रतीक ठरणार आहे.