बेळगावात मान्सून पूर्व पावसाची हजेरी
उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगाव आणि परिसरातील जनतेला मान्सून पूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला.दुपार नंतर शहर आणि परिसरात ठराविक कालावधीने मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.गेल्या दोन दिवसापासून उकाडा प्रचंड वाढला होता. जून महिन्याची दहा तारीख ओलांडून गेली तरी पावसाचे चिन्ह नव्हते.
शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या असून ते देखील वरुण राजा केव्हा येतो म्हणून वाट बघत आहेत.दोन दिवस ढग दाटून येत होते पण पाऊस काही आला नाही .रविवारी दुपार नंतर मात्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.सध्या लग्न सराई सुरू असून लग्नाच्या खरेदीला आलेल्या लोकांची आणि पर गावाहून आलेल्या लोकांची मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पंचाईत झाली.काही काळ हजेरी लावलेल्या मान्सून पूर्व पावसाने मात्र सुखद गारव्याचा अनुभव दिला.