प्रेमचंद यांचे लेखन सर्वसामान्यासाठी प्रेरणा दायक-डॉ .डी. एम. मुल्ला
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे हिंदीचे महान साहित्यकार मुंशी प्रेमचंद यांची 144 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एच.जे. मोळेराखी यांनी प्रेमचंद च्या प्रतिमेला पुष्प वाहुन पूजन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथपाल सुरेखा कामुले यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
यावेळी हिंदी विभागाअध्यक्ष डॉ. डी. एम. मुल्ला यानी प्रेमचंद विषयी बोलताना म्हणाले की, प्रेमचंद हे सामान्य जनतेच्या सोबत आपले जीवन जगले. समाजातील कष्टकरी, गरीब, किसान आणि सर्वहारा वर्गाच्या लोकांची जीवनपद्धती,त्यांचे राहणीमान,त्यांच्या समस्या, व्यथा इत्यादी आपल्या साहित्यातून मांडून भारताची समकालीन परिस्थिती येणाऱ्या पिढीच्या समोर ठेवण्याचे कार्य केले. यामुळे प्रेमचंद यांचे साहित्य आदर्शवादी आणि यथार्थवादी रूपाने आज ही श्रेष्ठ आहे. खऱ्या अर्थाने प्रेमचंद हेच सर्वसामान्यांचे नेता होते. म्हणुन प्रेमचंद यांचे लेखन सर्वसामान्यासाठी प्रेरणा दायक आहे.
यावेळी हिंदी विभागातर्फे प्रेमचंदा च्या साहित्यावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्राचार्य.डाॅ.एच.जे. मोळेराखी, प्रा. आर.एम.तेली, प्रा.एस.आर. नाडगौडा, प्रा. मायाप्पा पाटील,डाॅ. नागेश गाडीवड्डर आणि विद्यार्थी वर्ग बहसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नागेश गाडीवड्डर आभार मानले.