*सेवेसी ठायी तत्पर प्रशांत पाटील निरंतर*
कंग्राळी खुर्द गावातील वार्ड क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांनी दाखवून दिलं की एक ग्राम पंचायत सदस्य सुद्धा मनात आणलं तर किती कामे करू शकतो ग्रामस्वच्छता अभियान असो किंवा नदी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छतेबद्दल जागरूकता व प्रतिवर्षी गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर मार्कंडेय नदीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे व प्रतिवर्षी आपल्या जन्मदिवसानिमित्त गावातील एक सामाजिक कार्य करणे, मराठी शाळेच्या व्यासपीठावर पडलेले खड्डे बुजविणे असे अनेक बरीच काम आहेत.
त्या कामांच कौतुक करावं तितकं कमीच. आणि आज याच सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून दसऱ्यामध्ये होणाऱ्या दुर्गामाता दौडीसाठी शिवमुर्तीचा आजूबाजूचा परिसर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना घेऊन स्वच्छ केला तसेच कंग्राळी गावचे मुख्य बस स्टॅन्ड च्या मागील बाजूच्या झाडाच्या फांद्या बस स्टॅन्ड च्या वरून विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेला स्पर्श झाल्या होत्या त्यामुळे एक धोका निर्माण झाला होता.
मागील 15 ते 20 वर्षापासून याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते पण आज आपले सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी शिव चव्हाण व मनोहर पाटील यांना घेऊन त्या तिथून हटविल्या व बस स्टॅन्ड ला मोकळीक करून दिली त्यामुळे प्रशांत पाटील यांनी केलेल्या कामाची संपूर्ण गावातून प्रशंसा होत आहे.