This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*त्र्यंबकेश्‍वर येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारेे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !*

*त्र्यंबकेश्‍वर येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारेे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

_संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून शुद्ध प्रसादाची संकल्पना अस्तित्वात: भारतभर चळवळ राबवण्याचा निर्धार !_

*त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक)* – सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा धर्मांध भेसळयुक्त पदार्थ मिसळतात. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात ‘प्रसाद शुद्धी चळवळ’ राबवण्यात येणार आहे. त्यासाठी संकल्पना ‘ओम प्रतिष्ठान’, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत-महंत यांच्या पुढाकारातून प्रसादाच्या शुद्धतेसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ ही संकल्पना पुढे आली असून या संकल्पनेचा 14 जून या दिवशी त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रारंभ करण्यात आला. या वेळी सर्वप्रथम ‘ओम प्रमाणपत्रा’चे त्र्यंबकेश्‍वर मंदिरात विधीवत् पूजन करून अर्पण करण्यात आले. मंदिरात श्री त्र्यंबकेश्‍वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात या प्रमाणपत्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मंदिराच्या परिसरातील काही निवडक प्रसाद विक्रेत्यांना ‘हर हर महादेव’च्या गजरात ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्यात आले.

या वेळी अखिल भारतीय संत समिती धर्म समाज, महाराष्ट्र क्षेत्राचे अध्यक्ष महंत आचार्य पीठाधीश्‍वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज, मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे, ‘ओम प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. रणजित सावरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट, सावरकर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, नाशिक मंचर त्र्यंबकेश्‍वर डोंबिवली, मुंबई, ठाणे आणि पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आणि व्यावसायिक, पुरोहित महासंघाचे नाशिक येथील अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल, धर्मसभेचे वेदशास्त्र, यज्ञविद्या वाचस्पती भालचंद्र शौचे उपस्थित होते. ‘ही चळवळ भारतभर राबवण्यात येईल’, असे ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने श्री. रणजित सावरकर यांनी घोषित केले, तर या अभियानास त्र्यंबकेश्‍वर पुरोहित महासंघाचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे त्र्यंबकेश्‍वर येथील पुरोहित महासंघाचे अध्यक्ष श्री. मनोज थेटे यांनी घोषित केले.

समस्त हिंदु संघटना आणि संत-महंत, आखाडा परिषद, अखिल भारतीय संत समिती, पुरोहित महासंघ त्र्यंबकेश्‍वर, पुरोहित महासंघ नाशिक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदु समाज या सर्व संघटनांच्या माध्यमातून ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स पाठिंबा देण्यात आलेला आहे.

या प्रसंगी श्री. शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘ओम प्रतिष्ठान’कडून ‘ओम प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या सर्व उपक्रमाला माझा पाठिंबा आहे. हे सर्व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि शुद्धता राखण्यासाठी केलेला हा उपक्रम आवश्यक असून तो उत्तरोत्तर वाढत जाईल, अशी मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो.’’

‘ओम प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. रणजित सावरकर म्हणाले, ‘‘ बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. अनेक ठिकाणी हिंदु धर्माला भ्रष्ट करण्यासाठी प्रसादाचे अशुद्धीकरण करून ‘श्रद्धा जिहाद’ चालू आहे. गायीच्या चरबीपासून पेढे बनवले जातात. हिंदूंच्या देवतांना गोमांसाचा नैवेद्य हिंदूंच्या हातून पाप घडावे, या दृष्टीकोनातून हे जाणीवपूर्वक केले जात आहे. असा अशुद्ध प्रसाद येऊ नये, यासाठी ही चळवळ राबवत आहोत.’’ महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘या माध्यमातून आता ‘हलाल’ला नक्कीच झटका बसेल; कारण शबरीमलासारख्या प्रसिद्ध देवस्थानामध्येही ‘हलाल’च्या उत्पादनापासून बनवलेला प्रसाद या ठिकाणी दिला जात होता. अनेक मंदिरात असा प्रसाद दिला जातो. या चळवळीमुळे या सर्वांवर आता प्रतिबंध येईल.’’

महंत आचार्य पीठाधीश्‍वर डॉ. अनिकेत शास्त्री म्हणाले ‘‘अशुद्ध प्रसाद देऊन अधर्मियांकडून ‘श्रद्धा जिहाद’ होत आहे. याला आळा बसून यावर मात व्हावी. यासाठी श्री. रणजित सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच महाराष्ट्रातील जे धर्म अधिष्ठान आहे, त्यामध्ये पुरोहित संघ, वैदिक सनातन धर्म, अखिल भारतीय संत समिती, श्री स्वामी समर्थ केंद्र, मंदिर महासंघ अशा अनेक संघटना आणि धर्माचार्य यांनी अशी रूपरेषा ठरवली. मंदिर परिसरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या पूजा सामुग्रीचे सर्व्हेक्षण करूनच अंती त्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ देण्यात येईल.’’

* *काय आहे ‘ओम प्रमाणपत्र’ ?*
प्रसाद शुद्धी चळवळीअंतर्गत ‘ओम प्रमाणपत्र’ बनवण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात ‘क्यू.आर्. कोड’ देण्यात आला आहे. तो स्कॅन केल्यावर संबंधित मिठाई विक्रेत्याची सर्व माहिती समोर येते. त्यामुळे या प्रमाणपत्राचा कुणी दुरुपयोग करू शकणार नाही. आपण प्रसाद कुणाकडून खरेदी करत आहोत, याची माहिती या प्रमाणपत्रावरून सहज आपल्याला मिळणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24