पोलिसांनी केले १३ लाख रुपये रोख रक्कम जप्त .
दुचाकी वाहनावरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या कडून पोलिसांनी तेरा लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.
मार्केट पोलिसांनी फोर्ट रोडवरील पिंपळ कट्टा चौक येथे संशयावरून एका दुचाकी वाहना वरून जाणाऱ्या व्यक्तीला अडवून वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या
डिकित तेरा लाख रुपये सापडले.त्या रोख रक्कम बाबत समर्पक उत्तर देता आले नसल्याने पोलिसांनी तेरा लाख रुपये जप्त करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि जिल्ह्यात पोलिसांनी अनेक ठिकाणी चेक पोस्ट उभे केले आहेत.काही दिवसापूर्वी साड्या आणि टिफीन बॉक्स देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी तपासणी नाके उभे करून तपासणी करण्यात येत आहे.