हद्दपारी नोटीसीची सुनावणी पुढे ढकलली; पोलिस निरीक्षक अनुपस्थित
बेळगाव, दि. ८ ऑगस्ट – महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) विभागाकडून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीसंदर्भात शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी पोलीस उपायुक्त व न्याय दंडाधिकारी नारायण बरमणी यांच्या समोर सुनावणी पार पडली.
या सुनावणीसाठी शुभम शेळके यांनी आपले म्हणणे वकील महेश बिर्जे यांच्यामार्फत मांडले. मात्र, माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनावणीस अनुपस्थित राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
सुनावणी दरम्यान समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वकील वैभव कुट्रे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, नेते महादेव पाटील, उपाध्यक्ष विजय जाधव, नारायण मुचंडीकर, अशोक घगवे, अभिषेक कारेकर, रिचर्ड अंथोनी, किरण मोदगेकर आदींचा समावेश होता.