टिळकवाडी खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांची बेडी; संपूर्ण कुटुंब न्यायालयात हजर
बेळगाव : टिळकवाडी मंगळवार पेठेत 10 सप्टेंबर 2025 रोजी आस्ति वादातून घडलेल्या खून प्रकरणात तिलकवाडी पोलिसांनी फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
घटनेत, आरोपी गणेश लक्ष्मण दावले (वय 60, रा. गवळी गली, मंगळवार पेठ) याने आपल्या वहिनीचा धारदार शस्त्राने खून केला होता. पोलिसांनी त्याला त्याच दिवशी अटक करून न्यायालयात हजर केले होते. मात्र घटनेनंतर गणेशची पत्नी व दोन्ही मुले फरार झाली होती.
सातत्यपूर्ण तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी फरार आरोपींना शोधून काढले. अटक झालेल्यांमध्ये –
आरोपी क्र. 2 : यश गणेश दावले @ गवळी (25)
आरोपी क्र. 3 : आदित्य गणेश दावले @ गवळी (20)
आरोपी क्र. 4 : गणेशची पत्नी
या तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
तिलकवाडी पोलिस ठाण्याचे पीआय व त्यांच्या टीमने दाखविलेल्या तत्परतेचे पोलिस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे. या कारवाईमुळे परिसरात कायद्याबद्दल विश्वास दृढ झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.