*कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत प्लास्टिक मुक्ती अभियान*
पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून संपूर्ण जग दिवसेंदिवस प्लास्टिकच्या विळख्यात जखडले जात आहे.ऑपरेशन मदत अंतर्गत शाळेने सुरू केलेल्या प्लास्टिक मुक्ती अभियानाचा पुढील टप्पा म्हणून विद्यार्थ्यांना आठवडाभर आपल्या घरी वापरले जाणारे प्लास्टिक, बाटल्या मध्ये भरून शाळेत जमा करण्याचे सांगण्यात आले होते. गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली होती. याला विद्यार्थी व पालक यांनी प्रतिसाद देत शाळेतील जवळपास सर्व मुलांनी किमान एक,तर काहींनी 4,5 बाटल्या प्लास्टिक भरून आणुन या अभियानात आपला सहभाग दर्शविला.यावरून विद्यार्थ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले.
जवळपास 300 बाटल्या प्लास्टिक जमा करून महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर शाळेच्या या अभियानाची माहिती देण्यात आली.
शाळेने सुरू केलेले हे प्लास्टिक मुक्ती अभियान हळूहळू बेळगाव व परिसरातील सर्वच शाळांमध्ये सुरू करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिकेचे पर्यावरण अभियंते श्री.हणमंत कडलगी व प्रवीणकुमार,हेल्थ इन्स्पेक्टर शिल्पा कुंभार,सॅनिटरी इन्स्पेक्टर शिवानंद भोसले व अनिल बोरगावी,पर्यावरण स्नेही राहुल पाटील शाळेचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात शाळेने सुरू केलेल्या अभियानाचे सर्वांनी कौतुक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन सर्वोतोपरी सहकार्य देण्याचे मान्य केले.