सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये ‘वन महोत्सव’ निमित्त वृक्षारोपण
कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉव्हेन्ट स्कूलमध्ये बुधवारी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी शाळेच्या परिसरात फळांची झाडे लावण्यात आली.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शिक्षक विद्यार्थी तसेच शाळेचे पि. टी .ऐ . लक्षणीय उपस्थिती बघण्यास मिळाली.कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी व तयारी सर्व शिक्षक व पि. टी .ऐ तसेच वर्ग 8 ते 9 च्या विद्यार्थी यांनी पार पाडली.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतून फळांची झाडे मागवण्यात आली होती.
सेंट जोसेफ शाळेच्या व्यवस्थापक, सिस्टर नतालिया,यांनी आपल्या हाताने एका झाडाचे रोपण केले. आणि सोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एका वृक्षाचे रोपण केले.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या नेतृत्वाखाली मैदानात रोपांची लागवड केली तसेच त्यांना पाणी देऊन त्यांच्या संरक्षणासाठी रोपांना कठडे बांधण्यात आले.
यानंतर विद्यालयाच्या मैदानामध्ये सेंट जोसेफ शाळेच्या व्यवस्थापक, सिस्टर नतालिया यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, यावर भाषण दिले त्यांनी भाषणातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला. तसेच हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका, सिस्टर अँटोइनेट टिचर यांनी सुद्धा झाडाचे महत्व यावर भाषण दिले. आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच,प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती आपल्या भाषणात केली.
हायस्कूलच्या वरिष्ठ आरोग्या सिस्टर यांचे संपूर्ण कार्यक्रमात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. सोनाली खोत यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित संतोष घाटगे,परवेझ किणीकर,सुनील जाधव, सोनाली खोत, विनोद ढबाळे ,मॅन्युअल डिकरुज सतीश कलघटगी, संजीव गुडगनट्टी,फर्नाझ बुखारी,शोभा कुरबार,नाजनीन सौदागर,प्रतिभा गुट्टीगोळी,पराग चंदगडकर,यासह अन्य उपस्थित होते.