कायमस्वरूपी लोकअदालतचा हेस्कॉमला शॉक
मयताच्या वारसदारांना २५,३५,००० रुपयांची भरपाई देण्याचा आदेश
<span;>बेळगाव: बेळगुंदी येथील युवा प्रगतशील शेतकरी विक्रम महादेव पाऊसकर यांचा शेतामध्ये विद्युत भारित तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता. सदरच्या या दुःखद घटनेला <span;>हेस्कॉम<span;>चा निष्काळजीपणाला कारणीभूत ठरवून मयताच्या वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून व्याजासहित रुपये 25 लाख 35 हजार रुपये देण्याचा आदेश कायमस्वरूपी लोक अदालतचे सन्माननीय अध्यक्ष श्री रवींद्र पल्लेद व सदस्य श्रीमती भारती वाळवेकर,श्रीमती चैतना मठपती यांनी नुकताच हेस्कॉमला आदेश दिला.
<span;>या संदर्भात सविस्तर माहिती अशी की दिनांक ३०/०९/२०२० रोजी दुपारी १ च्या सुमारास बेळगुंदी येथील शेतकरी मयत विक्रम महादेव पावसकर हे आपल्या बेळगुंदी येथील उसाच्या शेतामध्ये उसावरील किटकाणचा प्रादुर्भाव नाश करण्यासाठी रोगप्रतिबंधक औषधाची फवारणी करतेवेळी त्यांना सदरच्या शेतामध्ये पूर्वीच तुटून पडलेल्या विद्युत भारत विजेच्या तारेची कल्पना नसल्याने अचानक सदर तारेचा मयत विक्रम यांना विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यासंबंधी मयताची पत्नी वैष्णवी विक्रम पाऊसकर यांनी बेळगांव ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेला <span;>हेस्कॉम<span;>चा दुर्लक्ष पणा कारणीभूत असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून <span;>हेस्कॉम<span;>च्या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपणपत्र दाखल केले होते.
<span;>सदरच्या घटनेबाबत मयताची पत्नी,दोन मुले व आईवडीलांनी कायमस्वरूपी लोक अदालत बेळगांव येथे मयताच्या मृत्यूबाबत नुकसाभरपाईसाठी अर्ज केला होता. सदरच्या दाव्यामध्ये अर्जदारांनी सादर केलेल्या साक्षी पुरव्या नुसार सदरच्या घटनेला संपुर्ण हेस्कॉमचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध केले. सदरच्या दाव्यामध्ये हेस्कोमच्या वतीने सुद्धा सक्षिपुरवा सादर करुन सदरच्या घटनेला हेस्कॉमचा तीळमात्र दुर्लक्ष पणा नसून सदरच्या घटनेला मयत विक्रम स्वतः च जबाबदार असल्याचा केविलवाणी प्रयत्न करण्यात आला.
<span;>परंतु अर्जदारांच्याकडून सादर केलेल्या साक्षी व पुराव्यानुसार कै विक्रम पाऊसकर यांच्या मृत्यूला पूर्णपणे हेस्कॉमचा दुर्लक्ष पणा सिध्द झाल्यानें मा. कायमस्वरूपी लोक अदालत च्या न्यायाधीशांनी या घटनेला हेस्कॉमला जवाबदार ठरवून अर्जदाराचां भरपाई अर्ज मंजूर करून अर्जदारांना मयताच्या मृत्यूची नुकसाभरपाई दाखल रु २१५८००० व त्यावर दावा दाखल केलेल्या तारखेपासून संपुर्ण नुकसाभरपाई भरेपर्यंत ६% टक्के वार्षिक व्याजाने एकूण 25 लाख 35 हजार रुपये निकालानंतर दोन महिन्याच्या आत देण्याचा आदेश देण्यात आला.
<span;>अर्जदारांच्या वतीने बेळगाव बारा असोसिएशनचे माजी प्रभारी अध्यक्ष ॲड .सुधीर.बी. चव्हाण यांनी काम पाहिले.