शहापूर पोलीस स्थानकात शांतता बैठक
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला असल्याने शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शहापूर येथील पोलीस स्थानकामध्ये शांतता सभेची बैठक घेतली यावेळी बैठकीत पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केली आणि आपल्याला सहकार्य करण्याची विनंती केली.
पारंपारिक वाद्यांना यंदाच्या गणेशोत्सव मध्ये स्थान द्यावे तसेच डॉल्बीला फाटा द्यावा, वृद्ध नागरिकांना रात्री त्रास होऊ नये याकरिता डॉल्बी लावू नये त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करून कायद्याचे पालन करावे.
जे कोणी त्याचे उल्लंघन करतील त्यांना चांगलाच चोप दिला जाईल. अशी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकाऱ्यांना आणि युवकांना सूचना केली