मार्केट पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक
सोमवारी होळी पौर्णिमा आणि मंगळवारी रंगोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी, प्रशांत सिद्धांत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता सदस्यांची बैठक नुकतीच शनिवारी सायंकाळी सात वाजता मार्केट पोलीस स्थानकात पार पडली.
सण-उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला असून कुणीही कायदा हातात घेण्याच्या प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस सहआयुक्त प्रशांत सिद्धांत गौडा,यांनी दिला होळी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. होळी, धुळवड आणि शब-ए-बारात हे उत्सव एकोप्याने साजरे व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी संवेदनशील भागातील शांतता समितीच्या सदस्यांची व पंचाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत विजय जाधव आणि सुनील जाधव यांनी पारंपरिक धुळवड ,रंगपंचमी व डॉल्बी संदर्भातील नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक व पोलीस सहआयुक्तांसमोर शहरांतील विविध विषयांवर सूचना मांडले.
यावेळी मार्केटचे पोलीस सहआयुक्तांनी बोलताना होळीच्या दिवशी सकाळपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. महिला व तरुणींची छेड काढणाऱ्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी स्थानिक पोलीसांना गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रंगोत्सवात सामाजिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था भंग होईल, असे कृत्य कोणीही करू नये यासह विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
सोमवारी होळी पौर्णिमा आणि मंगळवारी रंगोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी, प्रशांत सिद्धांत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता सदस्यांची बैठक शनिवारी सायंकाळी सात वाजता मार्केट पोलीस स्थानकात पार पडली.
या बैठकीला मार्केटचे पोलीस निरीक्षक प्रियकुमार, शिवाजी मंडोळकर,राजू भातकांडे, विजय जाधव,सुनील जाधव राजू खटावकर, प्रताप मोहिते, सचिन कणबरकर, पांडुरंग चिगरे, विनायक पवार,अरुण पाटील,संजय नाईक आदी उपस्थित होते. होळी आणि रंगोत्सवाच्या काळात व्यापक बंदोबस्त असणार आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.