*पाल्याला घडविण्यात पालकांचाच सहभाग महत्त्वाचा!*
प्राचार्य अरविंद पाटील यांचे प्रतिपादन.
कंग्राळी बी के येथील *वसुंधरा किड्स पॅराडाईज इंग्रजी माध्यम शाळेत प्रतिभा स्पंदन व सांस्कृतिक कार्यक्रम दिन संपन्न!*
लहान मुलं पालंकाचं अनुकरण करत करत शिक्षणाचे धडे घेत असतात.
म्हणून पाल्याच्या योग्यवेळेला वेळ देणारे पालक मिळाले तर त्याच्या जीवनात सुंदर वेळu यायला वेळ लागणार नाही, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पालक म्हणून आपली जबाबदारी ओळखून आपल्या आपल्यासोबत राहणं गरजेचे आहे. संघर्ष आणि आत्मविश्वास हा विकत घेण्याची गोष्ट नसून तो अनुभवावा लागतो. आपल्या पाल्याच्या जीवनात संघर्ष येऊ नये म्हणून पालकांनी पळ वाट शोधून देऊ नये कारण तसं झालं तर त्याच्या अंतरीक क्षमता लोप पावतात आणि पुढे जगणं असह्य होतं. त्याला पडू द्यात, रडू द्यात आणि घडू द्यात!
याच प्रक्रियेतून आत्मविश्वास जन्माला येतो आणि तो आत्मविश्वास पाल्यांना संकटाना घाबरण्यापेक्षा संकटाचं मर्म ओळखून अचूक पावलं टाकण्यास मदत करतो व यशस्वी होण्याचा गुरू मंत्र देतो!
कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने झाली. त्याच बरोबर गावातील अंध गायिका कु सोनाली चिखलीकर हिने गायलेल्या *सत्यम शिवम सुंदर गीताने* कार्यक्रमाचा बहर वाढविला. शाळेचे चेअरमन, प्रसिद्ध अडत व्यापारी श्री वाय बी चव्हाण हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, व्यासपीठावर मातृमांगल्य श्रीमती विमल चव्हाण, सुप्रसिद्ध कायदे तज्ञ अॅडोव्होकेट सुधीर चव्हाण, सिव्हील अभियंता राजकुमार पाटील व स्टेट बँकेचे कार्यकारी अधिकारी श्री हुंदरे तसेच इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका सौ. छाया पाटील उपस्थित होत्या.
शाळेने वर्षभरात केलेल्या विधायक कामांच्या नोंदी शाळेच्या शिक्षिका सौ. अश्विनी चव्हाण यांनी वार्षिक अहवाल वाचनातून निदर्शनास आणल्या.
या कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थीनी कुमारी वसुंधरा चव्हाण हिने केले.
या कार्यक्रमात प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी भेट वस्तू व आकर्षक प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या नंतर शाळेतील छोट्या विद्यार्थ्यानी भारतीय संस्कृती व परंपरावर आधारित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाची, नृत्य व गायनातून मनोरंजनात्मक मेजवानी देत आत्मचिंतनाचा आविष्कार घडविला. शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ अर्चना शंकर चव्हाण यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेच्या सहशिक्षिका शितल आणि कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले असून या कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री शंकर चव्हाण व बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होता.