जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित नेहरू महाविद्यालयाचा कुस्ती संघ अजिंक्य..!
एम्स पदवीपूर्व महाविद्यालय बैलहोंगल व पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगावी यांच्या अधिपत्याखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्ती संघाने अजिंक्य पद प्राप्त केले.
विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे कूस्तीपट्टू कुमार श्री मारुती घाडी 55 किलो ग्रीको रोमन कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक, कु. अनुक्षा जनगौडा 55 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारामध्ये प्रथम क्रमांक, कु. उमेश शिरगुंपी 61 किलो फ्री स्टाईल कुस्तीप्रकारामध्ये प्रथम क्रमांक तसेच बेल्ट रेसलिंग कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक, कु. कुणाल मेलगे ६१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, कु. नागराज चळकी 57 किलो गट द्वितीय क्रमांक, कु. विनायक पाटील 87 किलो गट ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक, कु. यशवंत चौगुले 92 किलो गटात फ्रीस्टाइल प्रकार प्रथम क्रमांक, कुमारी वैदेही पाटील 60 किलो गट फ्री स्टाईल प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वरील सर्व कुस्तीपटूंना महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ममता पवार, व शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले व संस्थेचे सचिव श्रीमान. प्रकाश नंदीहळी यांनी पुढील स्पर्धेकरिता कुस्तीपटूंचे अभिनंदन करून विशेष गौरव केला.
You have brought up a very great points, thankyou for the post.
Well I definitely enjoyed studying it. This subject procured by you is very practical for accurate planning.