“आमचे स्मशान आमचा हक्क ” देवगिरी ग्रामस्थांची मागणी
बेळगाव: कडोली ग्रामपंचायत हद्दीतील देवगिरी गावातील स्मशान भूमीच्या जागेवर एका व्यक्तीने जागा आपली असल्याचा दावा केला आहे. त्या विरोधात “आमचं स्मशान आमचा हक्क” अशी घोषणा देत देवगिरी गावातील ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. आंदोलनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून झाली. तिथून ज्याव्यक्तीने स्मशानभूमीची जागेवर दावा सांगत आहे. त्या व्यक्तीची प्रतिकृती घेऊन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर चन्नमा सर्कल येथे मानवी साखळी तयार करून गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर बेळगाव जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अनेक वर्षापासून ग्रामस्थ त्या जागेमध्ये अंतिम संस्कार करत आलो आहोत. त्या व्यक्तीने त्या जागेवर आपला दावा सांगितला आहे. तरी ही स्मशानभूमीची जागा गावामध्ये स्मशानभूमीसाठी राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
याप्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अक्त सहाय्यक केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.