बेळगाव :शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी राज्य सरकारने वक्फ बोर्डाचे माध्यम निवडले आहे. मात्र या विरोधात आता आमची जमीन आमचा हक्क या मागणीसाठी भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अॅड. एम.बी. जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डला हस्तांतरित करण्याचा नोटीस जारी केली आहे, त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत.
आम्ही डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमची जमीन आमचा हक्क योजनेअंतर्गत जनजागृती मोहीम सुरू करणार आहोत भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि चलवादी नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गरीब आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याच्या नोटिसा देऊन राज्य काँग्रेस सरकार संभ्रम निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.
२२ रोजी पहाटेपासून भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे नवीन पाहणी पत्र मिळावे. इतर कोणाचे ना आम्हाला कळविण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.