बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला बाल कल्याण विभाग आणि ज्येष्ठ नागरिक खात्यातर्फे तीन हजार गर्भवती महिलांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम बेळगावात आयोजित करण्यात आला होता. महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. गर्भवती महिलांच्या हातात काकणे भरून त्यांना आहेर करून पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील गर्भवती महिलांच्या समवेत भोजन केले. https://www.facebook.com/share/v/168ppaA7GF/
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वसहाय्य महिला गटांना उत्तेजन देण्यासाठी म्हणून बेळगाव, हावेरी, विजापूर, बागलकोट, कारवार, गदग आणि धारवाड या सात जिल्ह्यातील महिला स्व सहाय्य गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन सी पी एड मैदानावर भरवण्यात आले होते. या कार्यक्रमात शंभर दिव्यांगाना बॅटरी वर चालणाऱ्या व्हील चेअर, ब्रेल घड्याळ आणि लॅपटॉप वितरित करण्यात आले.
*येळ्ळूरची यात्रा 21 एप्रिलपासून*