भव्य कारगिल मॅरेथॉनच्या आयोजन
विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज विश्वभारती कला फाउंडेशनच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी दरवर्षी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले.त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सदर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून 11 जून रोजी बेळगाव मध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार असल्याचे सांगितले.
आजपर्यंत या फाउंडेशनने खानापूर दुर्गम भागात 15 मॅरेथॉन कुस्ती स्पर्धा पूर्ण केल्या असल्याची माहिती दिली .यावेळी बेळगाव मध्ये पार पडणारी मॅरेथॉन स्पर्धा ही लेले ग्राउंड ते मंडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत काढणार असल्याचे सांगितले.
तसेच ही मॅरेथॉन स्पर्धा 42, 21 10 आणि किलोमीटर असल्याचे सांगितले तसेच दिव्यांगांसाठी लेले ग्राउंड मैदान परिसरात तीन किलोमीटर ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी राजेंद्र बिर्जे यांनी दिली