बेळगामध्ये प्रथमच राज्यस्तरीय निमंत्रीतांच्या विश्वचषकाच्या धर्तीवर मॅटवरील फ्लड लाईट खो खो स्पर्धेचे आयोजन
साधना क्रीडा संघ ही संघटना सन् 1968 सालापासून खो-खो या खेळाच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. खो-खो स्पर्धांसाठी संघ तयार करणे, स्पर्धेत सहभागी होणे याबरोबरच विविध स्तरांवरील खो-खो स्पर्धांचे आयोजन साधना क्रीडा संघाने केल्या आहेत. संघाचे खेळाडू जिल्हा विद्यापीठ आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून चमकले आहेत.
आपल्या संघातील खेळाडूंच्या प्रशिक्षणाबरोबरच त्यांनी वैयक्तिक जीवनात शैक्षणिक व आर्थिक प्रगती करून जीवनातही यशस्वी व्हावे यासाठी संघ नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. आणि त्यामुळेच राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही आमच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवले आहे. अलीकडच्या काळात मात्र कांही कारणास्तव खो-खो या खेळाची पीछेहाट झाल्याचे दिसते. पण त्याचबरोबर आता सरकारच्या नव्या धोरणामुळे खो-खोमध्ये हे नवनवे तंत्रज्ञान येत असून या खेळालाही चालना मिळत आहे ही, आनंदाची गोष्ट आहे.https://dmedia24.com/the-8th-all-india-new-years-literature-summit-will-be-held-at-karad/
बेळगाव परिसरातील खो-खोला चालना देण्याच्या उद्देशाने आम्ही साधना क्रीडा संघाच्या वतीने बेळगाव मध्ये येत्या दिनांक 19 व 20 एप्रिल 2025 रोजी राज्यस्तरीय निमंत्रितांच्या फ्लड लाईट खो-खो स्पर्धेचे आयोजन करीत आहोत, कर्नाटकातील दर्जेदार अव्वल संघांना निमंत्रित करून त्यांचा खेळ दाखवण्याचा आमचा उद्देश आहे या स्पर्धा पाहून निश्चितपणे नव्या खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय नवे तंत्र पाहण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. येणारे स्पर्धक, खेळाडूंच्या राहण्या जेवणाची व्यवस्था तसेच त्यांच्या प्रवास खर्चासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. आपण आम्हास अर्थसहाय्य करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा ही कळकळीची विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क अध्यक्ष श्री संजय बेळगावकर 9448013915,सचिव श्री. सतीश बाचीकर 9844213816,खजिनदार श्री. पी. ओ. धामणेकर 9035241242,
स्पर्धेचे स्थळ : कन्नड मुला मुलींची शाळा नंबर 14 (जेल शाळा) वडगांव, बेळगांव.
दिनांक : 19 व 20 एप्रिल 2025 रोजी.
वेळ : सकाळी 8.00 वा.