चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग देवस्थानचे वर्धापन दिनाचे आयोजन
चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानचा दुसऱ्या वर्धापन दिनाचे आयोजन उत्साहात करण्याचा निर्णय मंदिर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असून रविवारी दिनांक ४ मे रोजी रात्री ब्रम्हलिंग भजनी मंडळ चलवेनहट्टी याचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ में रोजी सकाळी ७-०० वाजता देवाला अभिषेक घालण्यात तसेच सकाळी साते आकारा या वेळेत स्वराली संगीत कला मंच चलवेनहट्टी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम येणार आहे
त्यानंतर राजा पंढरीचा महिला हरिपाठ चलवेनहट्टी यांचा हरिपाठचा कार्यक्रम होणार आहे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत तसेच दुपारी सुरू १२ वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविकांनी संगीत भजनाचा कार्यक्रमासह अभिषेक तसेच महाप्रसादचा लाभा घ्यावा असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीने केले आहे.