नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
बेळगाव:
येळळूर येथील नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी आणि बारावी नंतर पुढे काय ? या विषयावर गीतन जोतिबा गिंडे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सदर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नवहिंद भवन येळ्ळूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.https://dmedia24.com/lumps-the-stolen-jewelry-amount-in-ujwalanagar/
दहावी आणि बारावी नंतर पुढे काय करायचे. कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असा संभ्रम बऱ्याच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडलेला असतो. अशा विद्यार्थी आणि पालकांना समुपदेशन करण्यासाठी सदर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती नवहिंद क्रीडा केंद्र, येळ्ळूर यांच्यावतीने करण्यात आली आहे.