श्री गुरुदेव रानडे यांच्या पुण्यतिथी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन
श्री गुरुदेव मंदिर हिंदवाडी येथे परमपूज्य श्री गुरुदेव आर डी रानडे यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चार पाच आणि सहा जून रोजी आयोजित केलेले कार्यक्रम एसीपीआर ऑडिटोरियम गुरुदेव रानडे मंदिर हिंदवाडी येथे पार पडणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत कार्यवाह एम बी जिरली यांनी दिली.
सदर पत्रकार परिषद सेंट्रल ब्युटी हॉटेलमध्ये पार पडली यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा एम बी जिरली यांनी उपस्थित्यांना दिली.
तसेच रविवार दिनांक 4 जून रोजी सकाळी दहा ते रात्री साडे आठ वेळेस विविध कार्यक्रम होणार असून सोमवार दिनांक पाच जुन रोजी देखील अशाच प्रकारे विविध कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार 6 जून रोजी सकाळी पाच ते सहा या वेळेत उदय राग म्हणजे काकड आरती होणार आहे तर नऊ ते दहा या वेळेत दासबोधन वाचन नामस्मरण दास व आरती होणार आहे.
तर 11 ते १ या वेळनेत एसीपीआर वेबसाईट आणि डेजिटेशन ऑफ बुस पॉईंट चे लोकार्पण प्रमुख पाहुणे महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच दुपारी एक वाजता भजन पुष्पांजली आणि महाप्रसाद होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.