दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जी.एस.एस. पदवीपूर्व महाविद्यालयात गणित विभागाच्या सांख्यिकी क्लब तर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ.अंजना जोशी, असिस्टंट प्रोफेसर, गणित विभाग ,जी.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेज यांनी अतिशय उत्तम रित्या” फिबोनाची सिक्येंन्स आणि निसर्ग “या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. निसर्गातील सौंदर्य आणि गणित हे कसे एकमेकांशी जोडले गेले आहेत ते उदाहरणांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेखला हीने केले.
कार्यक्रमाचे आयोजन सांख्यिकी क्लबच्या अध्यक्षा डॉ ममता कुट्टे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राचार्य प्रा.सुभाष देसाई, प्रा. रविशंकर आनंदाचे, प्रा. नागनाथ जोशी, प्रा. वेदश्री देशपांडे, प्रा. मनिषा पाटील, प्रा. भाग्यश्री कांबळे, प्रा. सोनिया चिट्टी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ ममता कुट्टे यांनी करून दिला.आभार प्रदर्शन प्रा. भाग्यश्री कांबळे यांनी केले.