रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे शनिवार दिनांक 17 जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळी रोटरी मेगा जॉब ऑफ 2023 या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लब ऑफ वेणू ग्राम बेळगावचे माजी अध्यक्ष डीपी पाटील यांनी बेळगाव शहर आणि आसपासच्या भागातील युवकांनी रोटरी आयोजित केलेल्या जॉब फेअरचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
रोटरी क्लब ऑफ वेणू ग्राम बेळगाव तर्फे पहिल्यांदाच शहरात मेला जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देऊन या उपक्रमामध्ये 40 गुण अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग असणार असल्याचे देखील सांगितले यामध्ये स्थानिक कंपन्यांसह पुणे बेंगलोर तसेच परगावच्या कंपन्यांचा समावेश असण्याची माहिती यावेळी दिली.
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावायत याकरिता या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून चार हजारापर्यंत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे यावेळी डी बी पाटील यांनी स्पष्ट केले.
क्लब रोडवरील बी के कॉलेज येथे शनिवारी सकाळी नऊच्या दुपारी तीन वाजेपर्यंत या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात दहावी बारावी पदवी उत्तीर्ण आयटी आयटीआय बी ई वगैरे शिक्षण घेतलेल्या युवकांना भाग घेता येणार आहे.तसेच पहिल्यांदा नोकरी करण्यास हो फ्रेशर्स सुद्धा या मेळाव्यात भाग घेऊ शकतात अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आतापर्यंत दहा हजार युवकांनी यामध्ये आपले नाव नोंदविले आहे तसेच शनिवार पर्यंत दोन-तीन हजार युवक आपले नाव नोंदणी करतील अशी अपेक्षा रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामच्या सदस्यांनी व्यक्त केली.