बेळगाव मध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन
हिंदू संघटन आणि हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याकरिता येत्या 19 मार्चला हिंदू राष्ट्र जागृती सभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांनी दिली.
ही सभा 19 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मालिनी सिटी बेळगाव मेन रोड शहापूर पोलीस ठाण्याजवळ तसेच भारत नगर शहापूर बेळगाव येथे घेण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत मनोज खांडये यांनी सांगितले.
यावेळी पुढे ते म्हणाले की या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता निलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसाद चालू असून विविध तरुण मंडळे महिलांचे गट ग्रामस्थ हिंदूतनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली