बेळगांव:सालाबाद प्रमाणे या वर्षी ही जी एस एस पी यु काॅलेजच्या हिन्दी विभागने हिन्दी दिवसाच्या अनुषंगाने विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने स्वयं रचित कविता चे प्रस्तुतिकरण केले. यावेळी हिन्दी भाषा का महत्व या विषयावर दानिया शेख या विद्यार्थीनीने विचार मांडले, संचिता रायकर ,महकनाज,मदिहा, तनिष्का नावगेकर,अलीझा पठाण,आणि प्रा जयश्री कनगुटकर यांनी छात्र या शीर्षकाची स्वयं रचित कविता सादर केली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि वक्ता या रूपाने वेणु ध्वनी बेळगावच्या रेडिओ जॅकी मनीषा सन्नाईक,मंजूनाथ पै,मंजूनाथ बळ्ळारी, उपस्थित होते, मनीषा सन्नाईक आणि मंजूनाथ पै या दोहोनी एफम रेडिओ चे कार्य आणि वेळेनुसार भाषा आणि ध्वनी यांचा समतोल राखणे, आणि समाजामध्ये योग्य संदेश आपल्या भाषाकौशल्यातून पोहचवणं, मनोरंजन ही मर्यादा उल्लंघन न करता करणे आदी अनेक विषयीची माहिती दिली.
या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, आणि पाहुणे मंडळी यांच्यामध्ये ,रेडिओ जॅकीनी त्याचे कार्य कशाप्रकारे चालते याची प्रात्यक्षिकं दाखवीली याचा आनंद आणि अनुभव विलक्षण होता याची प्रचिती सभागृहात निर्माण झालेली सजीवता आणि रोचकता यातून झाली.
मंचावर प्राचार्य एस एन देसाई, बहुभाषा विभाग प्रमुख प्रा.डाॅ अजित कोळी, वेणू ध्वनीच्या मनीषा सन्नाईक, मंजूनाथ बळ्ळारी, मंजूनाथ पै.उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी पावनी इरसंग यांच्या गणेश वंदना ने झाली, उपस्थित प्रमुख पाहुणे,विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.जयश्री कनगुटकर यांनी केला,
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य एस एन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, प्राचार्य एस एन देसाई यांचे स्वागत पुष्प देऊन बहुभाषा विभाग प्रमुख प्रा डाॅ ए एस कोळी यांनी केले, प्रा. रेश्मा सपले यांनी बहूभाषा विभाग प्रमुखाचे पुष्प देऊन स्वागत केले.सुत्रसंचालन प्रा उमा भोंजे,प्रा प्रज्ञा बांदवडेकर,विद्यार्थीनी सिबा हवालदार, सृष्टी कांबळे यांनी केले.आभार प्रा प्रज्ञा बांदवडेकर यांनी मांडले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगाण द्वारे करण्यात आली.