कडोली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
खास होळीनिमित्त कडोली गावात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धा युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ काल रविवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता थाटात पार पडला.
यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन युवा काँग्रेस नेते राहुल सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. तर समारंभाच्या अध्यक्षा म्हणून ग्रामपंचायत अध्यक्षा कडोली रेखा सुतार या होत्या.
यावेळी या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे तसेच केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी यष्टि पूजन कडोली ग्रामपंचायत उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन त्याशिवाय वैयक्तिक बक्षिसे विजया स्पर्धकांना देण्यात आली यावेळी पहिले बक्षीस 50000 रुपये व चषक तर दुसरे बक्षीस 25 हजार रुपये व चषक राहुल सतीश जारकीहोळी यांच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना देण्यात आले.