भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून हिंडाल्को प्रायव्हेट लिमिटेड व प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कंग्राळी बुद्रुक येथील कलमेश्वर मंदिर परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या आरोग्य शिबिरात नागरिकांच्या आरोग्याची चाचणी करण्यात आली यामध्ये रक्तदाब ,मधुमेह, नेत्र तपासणी ,कान ,डोळे, घसा ना यासह इतर आरोग्य विषयक चाचण्या करण्यात आल्या.
प्रारंभी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष पूनम पाटील ग्रामपंचायत सदस्य भारता पाटील ,जयराम पाटील ,दादासाहेब भादरगडे ,अनिल पावशे नवनाथ पुजारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली
यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टर मंडळींनी आपली उपस्थिती दर्शविली यामध्ये त्यांनी दंतचिकित्सा, न्यूरोलॉजिस्ट यासह नागरिकांना जडलेल्या अनेक आजाराची तपासणी केली.
यावेळी तज्ञ डॉ नवीन अंगडी, डॉ आदित्य कुलकर्णी ,डॉ प्रज्ञा पोरवाल, डॉ प्राजक्ता चव्हाण ,डॉ अक्षता पांडे ,केएलई नर्सिंग इन्चार्ज सरिता नाईक, डॉ बाबुराव गोगले, ईश्वर मगदूम ,मेडिकल हिंडाल्को इंडस्ट्रियल लिमिटेड चे रवी विसागुपी यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.