*गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन*
बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई शालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते 27 ऑक्टोबर 2024 रोजी रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व रोड रेस गणेश सर्कल रामतीर्थ नगर बेळगांव येथे करण्यात आले आहे, संपूर्ण भारतातून 10 विभागीय झोन व विदेशी झोन, दुबई , सौदी अरेबिया, ओमान, कतार, यूनायटेड स्टेट ऑफ अमिरात,येथून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी होणार असून या स्पर्धासाठी 1 सीबीएसई निरीक्षक भारतीय रोलर महासंघटना यांच्या वतीने 18 ऑफिशियल बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो यांच्या वतीने 20 मदतनीस व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल चे 65 शिक्षक हे सर्वजण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करणार आहेत .
या स्पर्धेचे उद्घघाटन पोलीस कमिशनर श्री इडा मार्टिन मार्बानिंनग यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी, माजी आमदार शाम घाटगे,राज घाटगे,अमित घाटगे, प्रेरणा घाटगे मॅनेजिंग डारेक्टर गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल, शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचिती आंबेकर, इंदुधर सीताराम सेक्रेटरी कर्नाटका रोलर स्केटिंग असो.,उमेश कलघटगी, ज्योती चिडक,निखिल चिंडक,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी, बेळगाव मधील इतर मान्यवर व शाळेचा स्टाफ हजर राहणार आहे.