विश्व हिंदू परिषद निपाणी यांच्या वतीने हिंदू संघटन मेळावा चे आयोजन
उद्या रविवार 1 सप्टेंबर 2024रोजी सायंकाळी ठीक 05-0 0वाजता श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.अशी माहिती सागर श्रीखंडे यांनी दिली यावेळी सागर श्रीखंडे यांनी सांगितले की
विश्व हिंदू परिषद ची स्थापना १७ ऑगस्ट १९७४ मध्ये केली गेली आज त्याला 60वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने देश भरात हीरक मोहत्सव म्हणून साजरा करणार आहोत ही संघटना सेवाकार्य करणारी देशातील एक स्वयंसेवी संस्था आहे.
देशातील महान साधू संत, महंत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य चालत आहे.हिंदू समाजातील उच्चनीचता, भेदाभेद दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्याचे कार्य करते. भारतासह संपुर्ण विश्वातील हिंदूंची सेवा, सुरक्षा व संस्कार करणे हा उद्देश समोर ठेवून विश्व हिंदू परिषद अखंड कार्य करत आहे. आपल्या सर्वाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी आंदोलन, न्यायालयीन लढा आणि मंदीराच्या जिर्णोध्दारापर्यंतचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे. अनेक मोठमोठ्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेने यशस्वीपणे आपली भूमिका घेतली आहे. आणि यापुढेही हिंदू हिताचे कार्य अखंडितपणे चालू राहणारच आहे.
या संघटनेच्या माध्यमातून हिंदूचे संघटन करण्यासाठी या हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उत्तर येतील प्राध्यापक राजेंद्र ठाकूर सर हे मार्गदर्शन करणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प.पू. प्राणलिंग महास्वामीजी असणार आहेत या कार्यक्रमासाठी निपाणी निपाणी परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संघटनेचे सागर श्रीखंडे यांनी केले आहे