संजीवनी फाउंडेशन च्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन वर्षापासून सदर फाउंडेशन रक्तदान शिबिराचे आयोजन करते.
यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले यावेळी जवळपास 50 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी संकलित केलेले रक्त सिव्हिल हॉस्पिटल ला देण्यात आले. महिलांचे हिमोग्लोबिन देखील तपासून त्यांना हिमोग्लोबिन शरीरात कशाप्रकारे वाढीस नेले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले यावेळी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत रक्तदात्यांनी रक्तदान केले.