बेळगाव जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आरोग्य व एनएसएस विभाग व आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच बेळगाव जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंधक विभाग तसेच बेळगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने DBAET च्या SBG आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालय व हॉस्पिटल बेळगाव येथे रक्तदान जागृती फेरी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान जनजागृती रॅलीचे उद्घाटन डॉ.महेश कोणी, डॉ.एस.एम.पल्लेद, डॉ. चांदणी देवडी, डॉ.श्रीकांत सुंडोळी, डॉ. टुक्कर,श्री. गिरीश बुदारकट्टी, डॉ. आदिवेश अरकेरी यांच्या हस्ते करण्यात आले.
SBG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज परिसर ते गणेशपूर अशी रॅली निघाली.रक्तदानाचा नारा देऊन रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.महेश कोणी यांच्या हस्ते धन्वंतरी देवीचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.महेश कोणी यांनी आजच्या युगात रक्तदानाचे महत्त्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच आजच्या युवा ने वर्षातून दोन वेळा तरी रक्तदान केले पाहिजे. जेणेकरून गरजूंना रक्त कमी पडणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच याप्रसंगी डॉ.एस.एम .पॅलेड उपसंचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगांव,डॉ.चांदणी देवडी जिल्हा कार्यक्रम अधिकारी DAPCU,बेळगांव,डॉ.श्रीकांत सुंडोळी जिल्हा आयुष अधिकारी,बेळगांव,डॉ टुक्कार, वैद्यकीय अधिकारी जिल्हा टीबी केंद्र बेळगांव, व्यवस्थापकीय संचालक,बेळगाव ब्लड बँकचे श्री गिरीश बुदारकट्टी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी DBAETS अध्यक्ष अमित घाटगे, डॉ.आदिवेश अरकेरी,डॉ अनिल कुरंगी, डॉ अरुण हविनाल, डॉ सुधीर पाटील,डॉ सागर उपस्थित होते.