पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री बारा वाजल्यापासून भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी आणि अभिषेकासाठी गर्दी केली होती.रात्री बारा नंतर अभिषेकला प्रारंभ करण्यात आला.पहाटे पर्यंत भक्तांच्याकडून अभिषेक करण्यात आले.त्यानंतर रुद्राभिषेक करून पूजा करण्यात आली.
महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली.पहिल्या श्रावण सोमवार निमित्त मंदिर आणि परिसराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून निघाला होता.भक्तांनी दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी केली होती.मंदिर परिसरात पूजा साहित्याची आणि खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती.