राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बेळगावच्या केएलई संस्थेच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.https://fb.watch/lckZCUSnbd/?mibextid=Nif5oz
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बेळगावच्या केएलई संस्थेच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र राज्यस्तरीय योग स्पर्धा आज आयोजित केले होते. यावेळी बाल योगपटू यांनी विविध प्रकारची योग प्रात्यक्षिके देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याबाबत माध्यमांना माहिती देताना आयोजक आरती संकेश्वरी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असे सांगितले .
या स्पर्धेत बंगळुरू, चिक्कमंगलुरू, चित्रदुर्ग, गुलबर्गा, धारवाड तसेच बेळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. योगामध्ये एकूण 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान वयातच मुलांना योगाचे महत्त्व कळावे आणि योगाचा सराव करावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर आजकाल मुले मोबाईलच्या मागे लागल्याचे पालकांनी सांगितले. शिवाय, त्यांच्याकडे अभ्यासाचा भार खूप आहे. त्यामुळे त्यांना सहज ताण येतो. योगामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव दूर होण्यास मदत होते. याशिवाय शारीरिक तंदुरुस्तीही राखता येते.
त्यामुळे आम्ही लहान वयातच मुलांना योगाची आवड निर्माण केली. प्रत्येकाने दररोज किमान अर्धा ते एक तास योगासने करावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी विविध वयोगटांमध्ये या योग स्पर्धा घेण्यात आल्या. याला योगसाधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.