जी एस एस पी यु काॅलेजमध्ये शालेय विद्यार्थ्यासाठी विज्ञान आणि सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे “,रिजाॅनन्स ” या शीर्षकाखाली आयोजन.
शालेय विद्यार्थी वर्गामध्ये विज्ञान व सांस्कृतिक विषयाचे ज्ञान आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमास विविध शालेय विद्यार्थी वर्गास आमंत्रित केले जाते.
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही या स्पर्धांचे आयोजन हायस्कूल विद्यार्थी वर्गासाठी करण्यात आले आहे, या अंतर्गत वैज्ञानिक मेळावा, वैज्ञानिक प्रदर्शन, रोबोटिक्स, पथनाट्य, चित्रकला,गायन,सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, एकपात्री अभिनय,क्रिडा, विषय निवडा आणि बोला,आशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शनिवार 7 आणि सोमवार 9 डिसेंबर 2024 असा दोन दिवस चालणार आहे.
या स्पर्धेत शालेय विद्यार्थी वर्गाने भाग घ्यावा असे प्राचार्य एस एन देसाई यांनी आव्हान केले आहे