रोटरी बेळगाव यांच्यावतीने हाफ मॅरेथॉनच्या आयोजन
जय भारत फाउंडेशनची रोटरी बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली यावेळी त्यांनी ही स्पर्धा सीपीड मैदानापासून सुरू होणार असल्याचे सांगितले.
तसेच या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अवयदानाविषयी जागृती करणारा असून यंदाची ही मॅरेथॉन अवयव दान जनजागृती थीम घेऊन आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या हॉफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर 10 किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर फॅन रन वॉक या चार प्रकारच्या शर्यती असणार आहेत तसेच या मॅरेथॉन करिता भारतातून दोन ते तीन हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
या मॅरेथॉन करिता वयो मर्यादा देखील जाहीर करण्यात आली आहे 16 ते 34 वर्षे 35ते 49 वर्षे 50 आणि त्यावरील सहभागींकरिता आकर्षक बक्षीस देखील ठेवण्यात आली असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.