बीए, बीकॉम आणि बीएससी विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स डेचे आयोजन
जेजीएनडी भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स बेळगावने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी बीए, बीकॉम आणि बीएससी विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स डेचे आयोजन केले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून चेतना सारंग उपस्थित होत्या .
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात स्वप्ने आणि ध्येये असण्याचे महत्त्व आणि त्यांची प्रतिमा बदलण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा याविषयी प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांनी आपला अनुभव देखील शेअर केला
यावेळी त्या म्हणाल्या की त्य स्वतःची तुलना इतरांशी करू नये, परंतु आपल्या जीवनात ध्येय साध्य करण्यासाठी आपण कौशल्य वाढवण्यावर भर द्यावा. असे सांगितले .
त्यानंतर जेजीएनडी भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य महावीर उपाध्ये यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांना काय हवे आणि काय नको हे स्पष्ट असले पाहिजे. असे म्हणाले .
या कार्यक्रमास सुनीता देशपांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते समन्वयक सौ.नीता गांगरड्डी यांनी स्वागत केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय बालेश मन्निकेरी यांनी केला तर आभार भारती हलसगी यांनी मानले.