एस के ई सोसाइटीच्या आर पी डी काॅलेजच्या वतीने विद्यार्थ्यासाठी इग्रंजी कार्यशाळेचे आयोजन .
आर पी डी काॅलेजचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एस.एस.शिंदे आणि प्राचार्या डा.आनुजा नाईक यांनी आज विद्यार्थी भाषेच्या अभावामुळे भविष्यात आपल्या कलागुणांना वाव देऊ शकत नाहीत, त्याची ही भीती आणि कमतरता दूर व्हावी आणि आपला विद्यार्थी भावी भविष्यात समाजात खणकर रित्या उभा रहावा,या दृष्टीने दहा दिवसाची इग्रंजी भाषेचे कार्यशाळा आयोजित करण्यात आली,
या कार्यशाळेसाठी विद्यार्थी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला, विद्यार्थी वर्गाची कार्यशाळा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याची परिक्षा घेण्यात आली. उतीर्ण विद्यार्थी वर्गास आज रोजी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ही कार्यशाळा डाॅ.शरयू पोटणीस आणि प्रा अमीना मुजावर यांनी चालविली,
यावेळी प्राचार्या अनुजा नाईक यांचा प्रा. एस एस शिंदे, प्रा वैशाली हनमगोंड,प्रा भारती अध्यापक, प्रा डाॅ ए एस कोळी यांनी पुष्पगुच्छ, शाल ,मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा सुरेश चौगुला, प्रा शर्मिला संभाजी, प्रा पूजा पाटील, प्रा हेमा अनगोळकर, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.