This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*अपघातातील जखमी महिलेला 46 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश*

*अपघातातील जखमी महिलेला 46 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश*
D Media 24

अपघातातील जखमी महिलेला 46 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश

बेळगाव :मोटर वाहन अपघात होऊन जखमी झालेल्या समर्थ नगर बेळगाव येथील महिलेला व्याजासहित एकूण रक्कम रुपये 46,06,791 रुपये भरपाई देण्याचा आदेश मा अकरावे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री रमाकांत चव्हाण यांनी दिले.

अपघातात संबंधी सविस्तर माहिती अशी की दिनांक 5/10/2021 रोजी रात्री 10.45 च्या सुमारास समर्थ नगर येथील जांगळे कुटुंबीय खास दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दांडिया कार्यक्रमाला उपस्थित राहून परत घरी चालत जात असते वेळी शृंगेरी कॉलनी बेळगाव या अपघाता स्थळी पोहोचले असता एक कार चालक आपली कार अति वेगाने आणि निष्काळ जीपणाने चालवून चालत जात असलेल्या जांगळे कुटुंबीयाला मागून जोराची धडक दिला. त्यामध्ये एकूण 8 जणांना दुखापत झाली. त्यापैकी सौ रेखा बाळू जांगळे वय वर्ष 43 हिला कमरेला गंभीर दुखापत झाली. ती सध्या संपूर्ण विश्रांती मध्ये आहे.

सदर महिलेने सदर अपघाताबाबत भरपाई मिळवण्यासाठी मा. जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. सदर दाव्यामधील साक्षी व कागदपत्राची पडताळणी करून न्यायालयाने तिचा दावा मंजूर करून युनायटेड विमा कंपनीने तिला भरपाई दाखल एकूण रक्कम रुपये 46,06,791 देण्याचा आदेश दिला. त्या आदेशानुसार सदरची व्याजासहत भरपाई रक्कम विमा कंपनीने न्यायालयात जमा केली. अपघातग्रस्त अर्जदार महिलेच्या वतीने बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply