अपघातातील मयताच्या वारसदारांना एकूण 60 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश
बेळगाव:मोटर वाहन अपघातातील मृत्यू पावलेल्या कै. श्री भाऊराव नारायण कंग्राळकर राहणार राकसकोप बेळगाव यांच्या वारसदारांना भरपाई दाखल व्याजासहित एकूण रक्कम रुपये 61 लाख 50 हजार रुपये देण्याचे आदेश मा चतुर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोहन प्रभू यांनी दिला.
अपघाता संबंधी माहिती अशी की दिनांक 7/12/2021 रोजी रात्री 8 च्या सुमारास मयत कै भाऊराव कंग्राळकर हे आपले काम संपून आपल्या दुचाकी मोटरसायकल वरून बेळगुंदी होऊन आपल्या गावी राकसकोपकडे चालले असता ते जेव्हा बेळगाव राकस्कोप रोड सोनोळी जवळ केंबाळी नाल्यावर आले असता एक दुचाकी स्वार आपली मोटार सायकल अति वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने मताला समोरून जोराची धडक देऊन अपघात केला .सदर अपघातामध्ये मयताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिथे जमलेल्या लोकांनी मयताला ताबडतोब उपचारासाठी के एल इ हॉस्पिटल ला दाखल केले .त्यानंतर त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. परंतु उपचाराचा फायदा न झाल्याने त्याचा दिनांक 19/12/21 रोजी मृत्यू झाला.
सदर अपघाताची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती.पोलिसांनी सदर अपघाताबद्दल सखोल चौकशी करून अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध दोषारोपण दाखल केले.सदर अपघातात बद्दल मयताच्या वारसदारांनी मृत्यूची नुकसान भरपाई मिळावी म्हणून गाडी मालक व विमा कंपनी विरुद्ध मा. जिल्हा न्यायालयांमध्ये भरपाई दावा दाखल केला होता. सदर दाव्यामधील साक्षी पुरावा व कागदपत्रांची पडताळणी करून मा. जिल्हा न्यायालयाने सदर दावा मंजूर करून “ओरिएंटल विमा कंपनीने” मयताच्या वारसदारांना भरपाई दाखल व्याजासहित एकूण रक्कम रुपये 61 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश दिला.
मयताच्या वारसदारांच्यावतीने भरपाई दाव्याचे काम बार असोसिएशनची उपाध्यक्ष अँड सुधीर चव्हाण यांनी पाहिले.