महानगरपालिकेमध्ये आज जनरल मीटिंग पार पडली यावेळी या बैठकीत मराठी माणसांवर कशा प्रकारे दडपशाही करण्यात येते हे दिसून आले.मराठीतून कागदपत्रे देण्यात आल्याने मराठी नगरसेवकांना सभागृहांमध्ये ठाण मांडून आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी भाजप मराठी नगरसेवकांनी या गोष्टीला पाठिंबा देण्याऐवजी पाठ फिरविली. मात्र विरोधी पक्ष नगरसेवकांनी आणि या गोष्टीला पाठिंबा देत मराठी नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मराठीतून कागदपत्रे देण्याची विनंती केली.
यावेळी मराठी नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला. तसेच महापौरचा नगरसेवकांनी खाली बसून अपमान केला असल्याने त्यांना सभागृहातुन जाण्याचा सल्ला दिला.
मात्र जोपर्यंत आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ यांनी मराठी नगरसेवकांना त्यांना प्रश्नाची उत्तरे द्या असे सांगून त्यांना त्यांच्या जागी बसण्याची विनंती केली.
त्याचबरोबर सभागृहात उत्तर आणि दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि राजू सेठ यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.कुणाचा अनुभव मोठा यापेक्षा विकासाची कामे पुढे नेण्यास आपण सभागृहात एकत्रित आले असल्याचे आमदार राजू सेठ यांनी सांगितले.
यावेळी देखील महापौर शोभा सोमनाचे यांनी भाजप पक्षांचे बोलणे आधी संपू दे मगच विरोधी पक्षाने बोलावे असे सांगून उत्तरच्या आमदारांना गप्प केले.
avrzpc
qatzu4
qvwuf4