वन टच फाउंडेशनची असहाय्य महिलेला रक्ताची मदत
धुनी भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या महिलेवर एक संकट कोसळले. त्यामुळे हाताश झालेल्या महिलेला करायचे काय हे समजले नाही. पदरी एक बारा वर्षाचे पोर तसेच नातलग ही नाही तर आता मदत कुणाकडून घ्यायची हा तिच्याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
यावेळी या व्यक्तीच्या मदतीला वन टच फाउंडेशन धावून आले यावेळी या महिलेने आपली सर्व हकीकत विठ्ठल फोडू पाटील यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी या महिलेची गरज ओळखून या गरीब महिलेला वन टच फाउंडेशनच्या माध्यमातून लागलीस तीन बॉटल रक्ताची व्यवस्था करून दिली.
रक्तदान महादान असे मानत वन टच फाउंडेशनने सदर महिलेला मदत केल्याने महिलेला आपले अश्रू अनावर झाले. त्यावेळी या महिलेकरिता श्रीनिवास पिसे यांनी रक्त दिल्याने महिलेने देखील श्रीनिवास पिसे यांचे आभार मानले यावेळी रक्तदान करा आणि इतरांचे जीवन वाचवा असा संदेश श्रीनिवास पिसे यांनी सर्वांना दिला.