मंदिरावर डल्ला मारणाऱ्या त्रिकटांपैकी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
खानापूर येथे मंदिरावर डल्ला मारणाऱ्या त्रिकटांपैकी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. प्रज्वल वागळेकर वय 21 राहणार बरगाव तालुका खानापूर असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित असे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की खानापूर येथे रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटी वर डल्ला मारत असताना पोलिसांनी पप्रज्वल याला ताब्यात घेतले. तसेच त्याचे दोन सोबती तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत.
येथील साई मंदिरातील दानपेटी रात्री एकच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना याचवेळी आपल्या घराच्या कामासाठी येणाऱ्या साहित्याची वाट पहात चार चाकी गाडीमध्ये बसून होते.
याचवेळी मंदिरातून आवाज ऐकाला आल्या असल्याने चोरट्याचा कारनामा त्यांचा लक्षात आला यावेळी त्यांनी मंदिरामध्ये जाऊन पाहिले असता तेथून चोट्याने धूम ठोकली. यातील एक संशयिताला डांबून ठेवण्यात आले तसेच दोन चोरट्यांनी तेथून पोबारा केला सध्या पोलीस त्या दोघांचा शोध घेण्यात गुंतले आहेत.