बेळगावातील विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.कपिलेश्वर पुलावरून मिरवणुकीतील ट्रॅक्टर जात असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.ट्रॉली खाली सापडलेल्या व्यक्तिला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.आणखी एका जखमी झालेल्या व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदानंद चव्हाण पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मिरवणूक पाहण्यासाठी आला होता.