रामदुर्ग पोलिसांनी कार मधून नेण्यात येणारे एक कोटी चोपन्न लाख रुपये जप्त केले.
कारमधून मोठी रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती रामदुर्ग पोलिसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून एक कोटी चोपन्न लाख रुपये
रोख रक्कम हस्तगत केली.या रक्कमेच्या बाबतीत कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रक्कम ताब्यात घेऊन त्याची मोजदाद केली असता ती रक्कम एक कोटी चोपन्न लाख रुपये
असल्याचे आढळून आले.या प्रकरणी कार मधील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या एक कोटी चोपन्न लाख रुपये रक्कमेच्या बाबतीत पोलिसांनी आयकर खात्याला कळवले आहे.सध्या निवडणूक होणार असून पोलिसांनी ठिकठिकाणी बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तपासणी नाके उभारले असून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.