गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी भाजपा नेते किरण जाधव यांचा सार्वजनिक मंडळांना भेट – भाविकांना दिल्या शुभेच्छा
बेळगाव :
गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी भाजपाचे नेते किरण जाधव तसेच इतर भाजपाचे पदाधिकारी यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडपांना भेट देऊन दर्शन घेतले व पूजेत सहभागी झाले.
या भेटीदरम्यान जाधव यांनी उद्याच्या गणेश विसर्जनासाठी असलेल्या मार्गांचा तसेच उंड्यांचा आढावा घेतला. पुढे नरवेकर गल्ली युवक मंडळाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात बोलताना त्यांनी गणेशोत्सवाच्या भव्यतेचा गौरव केला.
ते म्हणाले, “बेळगाव गणेशोत्सव कोणताही भेदभाव न करता, सर्व समाज घटकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणरायाने बेळगावकरांना सुख, शांती व विकासाची देणगी द्यावी,” अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
अनसूरक गल्ली भारत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती गल्ली सार्वजनिक मंडळ आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी अतिथींचे स्वागत केले. या प्रसंगी सार्वजनिक मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.