श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी
भक्ती भावाने आज महिलांनी श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी शहराची ग्रामदैवत असणाऱ्या बसवान गल्ली येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.
श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला उपवास करून देवीची पूजा अर्चा करतात तसेच देवीची ओटी भरून देवीचा आशीर्वाद सुद्धा घेतात.
आज श्रावणातील दुसरा शुक्रवार असल्याने महिलांनी बसवान गल्ली येथील लक्ष्मी मंदिरात दर्शनाकरिता गर्दी केली होती.
यावेळी महिलांनी आपल्या पतीदेवाला दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना देवी समोर केली. यावेळी मंदिर परिसर भक्तांनी फुलला होता तर मंदिराच्या बाहेर ओटी भरण्याचे साहित्य देखील ठेवण्यात आले होते.