श्री गणेश फेस्टिवल बेळगाव दिवस दुसरा 2023 आज ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम स्कूल मध्ये पाककला स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये हरभरा डाळी पासून बनवले जाणारे गोड पदार्थ व तिखट पदार्थ अशा दोन पदार्थांमध्ये स्पर्धा आयोजित केली होती त्याला भरघोस असा प्रतिसाद लाभला एकूण 50 पेक्षा जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये उत्साहात भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
सुरुवातीला गणेश पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आजचे गणेश पूजन श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअर पर्सन सौ ज्योती अग्रवाल यांच्या शुभहस्ते पार पडलं यावेळी राजमाता महिला सोसायटीच्या चेअर पर्सन सौ मनोरमा देसाई प्रतिभा नेगीनहाळ ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका जाधव भक्ती देसाई डॉ मीना पाटील तसेच राजमाता संस्थेच्या आणि भक्ती सोसायटीचे सर्व संचालिका आणि गणेश फेस्टिवल चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
हरभरा डाळीच्या तिखट पदार्थाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रश्मी बराटे द्वितीय क्रमांक दया देसाई तृतीय क्रमांक गीता जुवेकर तसेच हरभरा डाळीचे गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक नमिता पाटील द्वितीय क्रमांक वर्षा शिंदे तृतीय क्रमांक गीता जुवेकर यांनी पटकविला आहे यावेळी परीक्षक म्हणून प्रियंका कलगटगी श्वेता देसाई भूमिका बाजीगर व वरलक्ष्मी कडगोड यांनी काम पाहिले विजेत्यांना रोख पारितोषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले