सालाबाद प्रमाणे यावर्षीही चव्हाट गल्ली येथे सर्व देवस्थान मध्ये पूजा आणि गाराने घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी श्रावणातील पहिल्या श्रावण सोमवार निमित्त सकाळी 9 वाजता चव्हाट्या मंदिर येथून पूजा करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
तसेच गल्लीतील ढोरवाडा येथील मंदिर,कल्याण चौक येथे गणेश मंदिर त्यानंतर श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवदादा काठी आणि मारुती मंदिर मध्ये पूजा करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
यावेळी सर्व देवांची पूजा अर्चा करून त्यांना गाऱ्हाने घालण्यात आले याप्रसंगी गल्लीतील सर्व नागरिक महिला तसेच भक्त उपस्थित होते